श्री गुरु नृसिंह सरस्वती ज्योतिष कार्यालय
श्री गुरु नृसिंह सरस्वती ज्योतिष कार्यालय हे पारंपारिक ज्योतिषशास्त्र आणि धार्मिक विधींमध्ये निपुण असलेले एक श्रद्धास्थान आहे. आमचे कार्यालय धार्मिक आस्थेचे केंद्र असून, येथे सर्व प्रकारचे धार्मिक विधी आणि ज्योतिष सेवा शास्त्रोक्त पद्धतीने पार पाडल्या जातात.
आमचे ज्योतिषाचार्य श्री रत्नाकर अनंत खोत आणि अनिल रत्नाकर खोत यांना धार्मिक विधी, मंत्रजागर, वास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्रातील दीर्घकालीन अनुभव आहे. कर्मकांड, ग्रहशांती, पितृदोष निवारण, वास्तुदोष निवारण यांसारख्या विधींमध्ये आम्हाला विशेष प्राविण्य आहे.
आमच्याकडे सत्यनारायण पूजा, रुद्राभिषेक, नवग्रह शांती, वास्तु पूजा, ग्रहपीडा निवारण, तसेच कुंडली पत्रिका, भविष्यवाणी, रत्न परामर्श यांसारख्या सेवा शास्त्रोक्त पद्धतीने दिल्या जातात. प्रत्येक विधी अत्यंत धार्मिक आणि शुद्धतेने पार पाडला जातो, ज्यामुळे भक्तांच्या मनःशांतीसह शुभफलप्राप्ती होते.
आपल्यावर आलेल्या संकटांचे निवारण आणि ग्रहदशांचे समाधान शोधण्यासाठी श्री गुरु नृसिंह सरस्वती ज्योतिष कार्यालयात अवश्य भेट द्या. अनुभवी ज्योतिषाचार्यांचे मार्गदर्शन आणि शास्त्रोक्त विधींनी आपल्या जीवनातील समस्या सोडवा.
विश्वास ठेवा, धर्माचरण करा, सुख-समृद्धी अनुभववा!




ज्योतिष व धार्मिक सेवा
आमच्या अनुभवी ज्योतिषकडून सर्व प्रकारच्या सेवांचा लाभ घ्या.


जन्मपत्रिका व कुंडली
जन्मपत्रिका व कुंडली विश्लेषणासाठी तज्ज्ञ मार्गदर्शन मिळवा.
वास्तु व गृहदोष
वास्तुशांती व गृहदोष निवारणासाठी सल्ला मिळवा.
विशेष पूजा सेवा
कष्टनिवारण व आरोग्यसंपदा यासाठी विशेष पूजा आयोजित करा.
संपर्क साधा
आमच्या ज्योतिष सेवांसाठी संपर्क करा: ९४२३९३०८५४, आझाद लेन, सुरगाणा, नाशिक.
स्थान माहिती
आमचा कार्यालय नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यात आहे. येथे अनुभवी ज्योतिषी विविध धार्मिक व ज्योतिष सेवांसाठी उपलब्ध आहेत.
पत्ता
आझाद लेन सुरगाणा तालुका सुरगाणा जिल्हा नाशिक
कामकाज
सोमवार ते शनिवार
9423930854


आझाद लेन सुरगाणा तालुका- सुरगाणा नाशिक
श्रीपाद वल्लभ निवास धनेश्वर हौसिंह सोसायटी दिंडोरी रोड नाशिक म्हसरूळ 422004
